AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोलिस पदभरती आली!
नोकरी आणि शिक्षणAgrostar
पोलिस पदभरती आली!
➡️पोरांनो, तयारीला लागा तीन वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरतीची आता घोषणा झाली आहे. आता ११ हजार ४४३ (गट-क) पोलिसांची पदे भरली जाणार आहेत. ऑक्टोबरअखेरीस भरतीची प्रक्रिया सुरु होऊ शकते. ➡️पोलिस भरतीवेळी पहिल्यांदा मैदानी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असून त्याची लवकरच गृह विभागाकडून घोषणा होईल. ग्रामीण भागातील तरूण लेखीच्या तुलनेत मैदानी परीक्षेत चांगले गुण घेतात. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिस भरतीच्या निकषांत ऐतिहासिक बदल केला. ➡️सुरवातीला लेखीऐवजी मैदानी आणि मुलाखत बंद, असे निर्णय घेतले. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींना नोकरीची संधी मिळाली.काही वर्षांपूर्वी त्यात पुन्हा बदल झाला ज्यामध्ये पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीत गोळाफेक, धावणे या बाबींचा समावेश आहे. ➡️राज्यभरातील चार ते सहा लाख तरूण पोलिस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. ऑक्टोबरअखेरीस पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होऊन नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष भरती होईल. त्यात पोलिस शिपाई, चालक, सशस्त्र पोलिस शिपाई अशी पदे आहेत. ➡️पोलिस भरती साठी आवश्‍यक कागदपत्रे:- १. दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र २. महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) ३. शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला ४. आधार कार्ड, जात प्रमाणपत्र ५. नॉन क्रिमीलेयर, लग्न झाले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री) ६. चालक पदासाठी हलके वाहन चालवण्याचा टीआर परवाना ➡️अधिक माहितीसाठी क्लिक करा : https://www.mahapolice.gov.in/ ➡️संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
20
इतर लेख