AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुढील आठवड्यात पावसाला पुन्हा सुरूवात होण्याचा अंदाज!
कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
पुढील आठवड्यात पावसाला पुन्हा सुरूवात होण्याचा अंदाज!
➡️ राज्यात चालू आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असून, पुढील आठवड्यात पावसाला पुन्हा सुरूवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ➡️ हवामान विभागाने जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार चालू ६ ते १२ ऑगस्ट या कालावधीत राज्यात पावसाची दडी कायम राहणार आहे. अनुकूल हवामान नसल्याने महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम विदर्भात मात्र हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. ➡️ येत्या १३ ते १९ ऑगस्ट या कालावधीत राज्याच्या बहुतांशी भागात पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहणार आहे. तर उर्वरित राज्यात आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकणात जोरदार पाऊस पडणार असून, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. येथे होणार जोरदार पाऊस रविवार : संपूर्ण राज्यात तुरळक सरी सोमवार : संपूर्ण राज्यात तुरळक सरी मंगळवार : संपूर्ण राज्यात तुरळक सरी बुधवार : संपूर्ण राज्यात तुरळक सरी राज्यात तुरळक सरी राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक कमी होऊ लागली आहे. सध्या राज्यात तुरळक ठिकाणी तुरळक सरी बरसत आहे. माथेरान, श्रीवर्धन, दापोली, गुहागर, लांजा, मंडणगड, राजापूर, संगमेश्वर, वैभववाडी, वेंगुर्ला, आजरा, पन्हाळा, राधानगरी, माहूर, पातूर, अहेरी, कोर्ची, सिंरोचा, मालेगाव, दिग्रस येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अनेक भागात पाऊस नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
246
34
इतर लेख