AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीक विमा, दुरुस्तीला 4 दिवसाची मुदत!
समाचारAgroStar
पीक विमा, दुरुस्तीला 4 दिवसाची मुदत!
👉🏻खरीप विमा 2023 साठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिक विम्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्यात आला होता त्यामध्ये एक कोटी सत्तर लाखापेक्षा जास्त पॉलिसी बनविण्यात आल्या होत्या आणि त्या सर्व पॉलिसी पीक विमा माध्यमातून होत्या. मात्र पिक विमा योजनेतून अर्ज भरत असताना मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने अर्ज भरण्यात आले. 👉🏻 चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे एकंदरीत पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मिळाला नाहीत आणि आता हे अर्ज दुरुस्तीसाठी फक्त आणि फक्त चार दिवसाची मुदत देण्यात आलेली आहेत. यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत जसे की आधार वरील नाव वेगळे आणि बँक खात्यावरील नाव वेगळे अशा बऱ्याच अडचणी दिसून आलेल्या आहेत. 👉🏻जर आपल्याला देखील पिक विमा मिळालेला नसेल आणि आपल्या देखील अर्ज चुकीचा झाला असेल तर आपल्याला दिलेल्या मोबाईल नंबर वरती एसएमएस आला असेल की आपल्याला आपले अर्ज हे दुरुस्त करणे अतिशय गरजेचे आहे. दुरुस्त केल्यानंतर सात दिवसांमध्ये आपल्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी केल्या जाईल आणि आपण या योजनेसाठी पात्र आहात का ही सर्व पडताळणी करूनच आपल्याला पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहेत. आपण लवकरात लवकर आपला देखील अर्ज चुकीचा झाला आहेत का हे पडताळून घ्यावे. 👉🏻आपण स्वतः पिक विमा भरलेला असेल तर आपल्या स्वतःच्या अकाउंट मधून स्वतः लॉगिन करून त्या ठिकाणी जर काही त्रुटी असतील तर त्या दुर करुन घ्या. जर शेतकऱ्यांनी सी एस सी केंद्रावरून पिक विमा भरलेला असेल तिथे जाऊन आपल्या पॉलिसी मध्ये जे काही आपल्याला तोटे एसएमएस द्वारे सांगण्यात आलेले आहेत तसेच काही कागदपत्राची त्रुटी सांगण्यात आली असेल त्या त्रुटी त्यांच्या माध्यमातून दुरुस्त करून घ्या . 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
0
इतर लेख