गुरु ज्ञानAgrostar India
पिकामध्ये सिलिकॉन चा वापर महत्वाचा
👉पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर जैविक (किडी-रोग) व अजैविक (हवामान, तापमान, पाणी ताण) ताणांचा मोठा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक आहे.
👉लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून ती उन्हात तापवावी, यामुळे जमिनीत असलेल्या किडी-रोगांच्या सुप्त अवस्थांचा नाश होतो. तसेच, पीक फेरपालट केल्याने किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. लागवडीसाठी सहनशील वाण निवडावेत आणि योग्य अंतर ठेवून लागवड करावी.
👉पिकातील तणे वेळीच हटवावीत कारण ती किडींसाठी आश्रय ठरतात. तण नियंत्रणासाठी खुरपणी किंवा तणनाशकांचा वापर करावा. पिकात चिकट, कामगंध व प्रकाश सापळ्यांचा वापर करावा जेणेकरून किडींचे वेळीच नियंत्रण होईल.
👉प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे वेचून नष्ट करावीत. आवश्यकतेनुसार योग्य कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. उन्हाळ्यात जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी पालापाचोळा झाडांभोवती वापरावा.
👉ताण कमी करण्यासाठी सिलिकॉन 1.5 मि.ली./लिटर फवारणी करावी. पीक अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करणेही आवश्यक आहे. या उपायांनी पीक ताणमुक्त राहून उत्पादनात वाढ होईल.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.