AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकामध्ये चिकट सापळे लावण्याचे फायदे!
गुरु ज्ञानAgroStar
पिकामध्ये चिकट सापळे लावण्याचे फायदे!
🌱रस शोषक किडी पिकातील हरितद्रव्य शोषून घेतात. पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे हे कीटक पिकामध्ये विषाणूजन्य रोगाचे वाहक म्हणून काम करतात. त्यामुळे विषाणूजनीत रोग पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवले जातात.पिकाच्या सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये निळ्या आणि पिवळ्या अश्या दोन्ही चिकट सापळ्यांचा वापर करावा, पिवळ्या चिकट सापळ्याकडे पांढरी माशी, मावा, तुडतुडे तसेच निळ्या सापळ्यांकडे फुलकिडे आकर्षित होतात व चिकट सापळ्यांवर येऊन चिपकतात, या वरून आपल्या शेतात कोणत्या किडीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे हे समजून येते व त्यावरून फवारणीचे नियोजन करू शकतो,तसेच अतिरिक्त औषधांचा वापर वहोणारा खर्च टाळला जातो. चिकट सापळे जास्त प्रमाणात लावले तर कीड नियंत्रणास मदत होते. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख