AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकातील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रस शोषक कीड नियंत्रण!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पिकातील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रस शोषक कीड नियंत्रण!
➡️टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय तसेच केळी, पपई अश्या विविध पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. ➡️या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर यावर उपाययोजना करणे अशक्य असल्याने पिकाचे संपूर्ण नुकसान होते. ➡️विषाणूजन्य रोगांचे वहन पिकांमध्ये रस शोषणाऱ्या किडींमुळे होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकात रस शोषक कीड वेळीच नियंत्रित ठेवावी. ➡️कीड नियंत्रणासाठी सुरुवातीपासून चिकट सापळ्यांचा वापर करावा, पीक वाढीच्या अवस्थेत आंतरप्रवाही कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक आळवणी करावी. ➡️किडीचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून योग्य कीटकनाशची फवारणी करावी. पिकांची फेरपालट, जमिनीची मशागत व इतर मशागतीचे कामे याकडे विशेष लक्ष द्यावे. ➡️पिकात गरजेनुसार योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे जेणेकरून पीक कीड - रोगांना जास्त बळी पडणार नाही. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
3
1