AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकविम्याला राज्य सरकारचा हिरवा कंदील, 4 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ!
कृषी वार्ताTV9 Marathi
पिकविम्याला राज्य सरकारचा हिरवा कंदील, 4 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ!
➡️ पिक विमा रक्कम वितरण करण्याच्या प्रसंगी विमा कंपनीचा कायम हात आखडता राहिलेला आहे. मात्र, गतवर्षी खरीप हंगामात बीड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पॅटर्नचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे चित्र आहे. ➡️ त्याअनुशंगाने प्रशासनाकडूनम पाठविण्यात आलेल्य़ा प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १० हजार रुपयांचा फायदा होणार आहे. याकरिता ९३६ कोटींचा पीक विमा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय झााला आहे. ➡️ बीडमध्ये मात्र, गतवर्षीचे विम्याचे १० हजार रुपये मिळणार का याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु होती. राज्य सरकारने विशेष असा ‘बीड पॅटर्न ‘ राबविण्याचे ठरवले होते. ➡️ त्यानुसार विमा कंपनीला द्यावी लागणारी नुकसान भरपाई ११० टक्के पेक्षा अधिक असेल तर वरची रक्कम राज्य सरकार देईल आणि सदर नुकसान भरपाई ही ८० टक्के पेक्षा कमी असेल तर कंपनीला खर्चापोटी २० टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकार घेणार असा करार केल्याप्रमाणे आता या रकमेतील यातील २० टक्के म्हणजे १६० कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली असली तरी ६२५ कोटी रुपये हे शिल्लक राहणार आहेत. ही उर्वरीत रक्कम ही नफा असून तो शासनाकडे येणार आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
7