AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी!
पशुपालनमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी!
• पावसाळयापुर्वी गोठा दुरुस्त करावा. छताची छिद्रे बंद करावीत. गोठया भोवती पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. गोठयात ओलसरपणा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. • गोठे स्वच्छ व कोरडे ठेवावेत. चिखल होवू देवू नये. • हिरव्या चार्‍याकरीता ज्वारी, बाजरी, मका यासारखे पिकांना प्राधान्य द्यावे. याचबरोबर बहुवार्षिक पिकांमध्ये यशवंत, मेथीघास यासारखी पिके घ्यावीत. • साठविलेल्या सुक्या चार्‍यावर पाणी पडून त्यात बुरशी लागली असेल तर असा चारा जनावरांना देऊ नये तो नष्ट करावा. • जनावरांचे खाद्य / खाद्यघटक दमट आर्द्रता युक्त वातावरणात साठवू नयेत. त्यामध्ये भिंतीचा / जमिनीचा ओलसरपणा मुरणार नाही याची काळजी घ्यावी. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- महात्मा फुले कृषी विद्यापीठ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4