AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा पुढील २ दिवसाचा हवामान अंदाज!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
पहा पुढील २ दिवसाचा हवामान अंदाज!
➡️ महाराष्ट्रातील हवेचे दाब रविवारी आणि सोमवारी १०१२ हेप्टापास्कल इतके राहतील. तोपर्यंत थंडीचे प्रमाण साधारणच राहील. मंगळवार पासून महाराष्ट्राचे उत्तर भागावर १०१४ व दक्षिण थंडीचे प्रमाण वाढेल व ते त्यापुढे कायम राहील. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील. उत्तर भारतातील हवेचे दाब १०१६ हेप्टापास्कल पर्यंत वाढतील व त्यामुळे उत्तर भारतात धंदीचे प्रमाण अधिक असेल. कोकण - रत्नागिरी व रायगड जिल्यात अत्यल्प पावसाची शक्यता रविवारी व सोमवारी राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २१सेल्सिअस राहील. ➡️ उत्तर महाराष्ट्र - नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यात राहील.तर जळगाव जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १९ते २० अंश सेल्सिअस राहील. ➡️ मराठवाडा - औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी पावसाची शक्यता निर्माण होईल आणि १२ मी. मी. पावसाची शक्यता राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.व पावसाची श्यक्यता कमी आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. ➡️ पश्चिम विदर्भ - अकोला व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. तर बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. ➡️ मध्य विदर्भ - नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील ➡️ पूर्व विदर्भ - रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात १३ मी. मी. गडचिरोली जिल्ह्यात २१ मी. मी तर सोमवारी या दोन्ही जिल्ह्यात ३० ते ३२ मी. मी. पावसाची शक्यता आहे. भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात रविवारी ७ ते १३मी. मी. व सोमवारी ५ ते १५ मी. मी. पावसाची शक्यता आहे. ➡️ दक्षिण पश्चिम महाराष्ट्र - कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, व पुणे जिल्ह्यात सोमवारी अल्पशा पावसाची शक्यता राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. अंशतः ढगाळ वातावरण राहील. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
53
6