AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालन क्रेडिट कार्ड!
योजना व अनुदानAgrostar
पशुपालन क्रेडिट कार्ड!
➡️केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या स्कीम चलविल्या जात आहेत. याअंतर्गत आर्थिक सहाय्यही दिले जात आहे. त्यामधील च एक योजना म्हणजे पशुपालन क्रेडिट कार्ड! ➡️जे शेतकरी गाय, म्हैस, बकरी अथवा मच्छीपालनासारखे व्यवसाय करतात, त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून हे कार्ड दिले जात आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र आणि राज्यांमध्ये पशूपालनाला प्रोत्साहन देणे असा केंद्र सरकारचा उद्देश आहे. यामुळे देशभरातील दूध, दूधाचे पदार्थ आणि मांसाची कमतरता पूर्ण केली जाईल. ➡️तसेच पशुधन किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या संगोपनासाठी लागणाऱ्या खर्चासाठी पशुधन किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज मिळू शकते. ➡️यामध्ये अशी तरतूद आहे की, कोणत्याही पशुपालक शेतकऱ्याला 1 लाख 60 हजार रुपयांच्या पशुधन शेतकरी क्रेडिट कार्डवर कोणतीही जमीन गहाण न ठेवता तारण सुरक्षिततेची हमी मिळू शकते. ➡️आवश्यक कागदपत्रे : शेतकऱ्याचे आधार कार्ड, शेतकऱ्याचे पॅनकार्ड, शेतकऱ्याच्या जमिनीचा तपशील पासपोर्ट साईज फोटो ➡️आपण हे पशुपालन क्रेडिट कार्ड आपल्या भागातील कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन बनवून घेऊ शकता. ➡️संदर्भ :Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
83
31
इतर लेख