गुरु ज्ञानAgrostar
पपई पिकातील खोडकूज नियंत्रण
पपई पिकात आढळणारा खोडकूज रोग (Stem Rot) हा बुंधासड नावाने देखील ओळखला जातो. या रोगाचे मुख्य कारण जास्त पाणी व निचऱ्याचा अभाव आहे. जेव्हा झाडाच्या बुंध्याला जास्त ओलावा मिळतो, तेव्हा बुरशीची वाढ होते आणि बुंधा हळूहळू काळसर पडून मऊ होतो, परिणामी झाड कोसळण्याची शक्यता वाढते.
⏩ प्रतिबंधात्मक उपाय:
✅ योग्य जमीन निवड – पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीतच पपईची लागवड करावी.
✅ सिंचन व्यवस्थापन – खोडाला पाणी लागू नये म्हणून दुहेरी बांगडी पद्धतीने पाणी द्यावे.
✅ रोगप्रतिकारक वाण निवड – प्रतिकारक्षम वाण लागवडीसाठी निवडावेत.
✅ फंगस नियंत्रण उपाय – रोपे लागवडीनंतर 8-10 दिवसांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्लूजी घटक असणारे कूपर 1 बुरशीनाशक @500 ग्रॅम प्रति एकर आळवणी करावी.
👉योग्य व्यवस्थापन केल्यास पपई पिकाचे नुकसान टाळता येते व उत्पादनात वाढ होते!
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.