AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी व्हा
कृषि वार्तापुढारी
पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी व्हा
राज्यात खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजना सर्व जिल्हयात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागीसाठी २४ जुलै ही अंतिम मुदत असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. शासनाने जिल्हानिहाय विमा कंपन्यांची नावेही अंतिम केलेली आहेत. त्याचबरोबर योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या बॅंक व आपले सरकार सेवा केंद्र, विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.
शेतकऱ्यांना केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीच्या अगोदर ऑनलाइन अर्ज भरता न आल्यास पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही. तरी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी नजीकच्या केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. संदर्भ – पुढारी, २ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
46
0