AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नोकरीपेक्षा वरचढ ठरतोय हा व्यवसाय, 15 लाखापेक्षा अधिक फायदा!
व्यवसाय कल्पनाNews 18 lokmat
नोकरीपेक्षा वरचढ ठरतोय हा व्यवसाय, 15 लाखापेक्षा अधिक फायदा!
➡️शेतीपूरक व्यवसाय करण्यावर सध्या भर देण्यात येत आहे. सरकारदेखील व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करीत आहे. तुम्हालाही शेती करून स्वतःचं उत्पन्न वाढवायचं असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाची माहिती देणार आहोत. ➡️तुम्ही तुमच्या शेतीमध्ये आल्याचं पीक घेऊ शकता. यासाठी सरकारदेखील तुम्हाला मदत करेल. आल्याचा वापर चहा ते भाजी किंवा इतर कोणत्याही पदार्थांत घराघरात केला जातो. थंडीत याचा वापर जास्त होतो. चला तर मग जाणून घेऊया आल्याची शेती कशी करावी. अशी करा लागवड ➡️आल्याची लागवड करण्यासाठी या पिकाचे कंद वापरले जातात. मोठ्या आल्याचे अशाप्रकारे तुकडे केले जातात की एका तुकड्यात दोन ते तीन कोंब असतील. आल्याची लागवड प्रामुख्याने नैसर्गिक पावसावर अवलंबून असते. ➡️याची शेती स्वतंत्र किंवा आंतरपीक म्हणून करता येईल. पपई, तसेच इतर झाडांसह तुम्ही आल्याची शेती आंतरपीक म्हणून करू शकता. एक हेक्टरमध्ये लागवडीसाठी १२ ते १५ कंद लागतात. आंतरपीक म्हणून आल्याची शेती करताना बियाण्याचं प्रमाण कमी लागतं. लागवडीची पद्धत ➡️आल्याची लागवड करताना दोन वाफ्यातील अंतर ३० ते ४० सें.मी आणि दोन रोपांमधील अंतर २० ते २५ सें.मी ठेवलं जावं. तसंच कंद चार ते पाच सेंटीमीटर जमिनीच्या खाली घालावे, व ते माती किंवा शेणखताने झाकून टाकावे. लाखो रुपयांचा नफा ➡️आल्याचं पीक साधारण ८ ते ९ महिन्यांत तयार होतं. या पिकाचं सरासरी उत्पादन हेक्टरी १५० ते २०० क्विंटल असतं. 1 एकरात १२० क्विंटल आल्याचं उत्पादन होतं. एका हेक्टरमध्ये या पिकाची लागवड करण्यासाठी सुमारे ७ ते ८ लाख रुपये खर्च येतो. ➡️बाजारात आल्याचा भाव ८० रुपये किलोपर्यंत आहे. हा भाव सरासरी ५० ते ६० रुपये गृहीत धरला, तरी एक हेक्टरमधून तुम्हाला २५ लाख रुपये मिळतील. सर्व खर्च वजा केल्यानंतरही तुम्हाला 15 लाख रुपयांचा फायदा होईल. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
2
इतर लेख