AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नेमंक कसं मिळणार सोयाबीन, कापूस अनुदान!
कृषि वार्ताAgroStar
नेमंक कसं मिळणार सोयाबीन, कापूस अनुदान!
👉🏻गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. यामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना तर हमीभावापेक्षा कमी दारात कापूस आणि सोयाबीनची विक्री करावी लागली. परिणामी खरीप हंगाम 2023 मध्ये उत्पादित केलेल्या कापसाला आणि सोयाबीनला अनुदान दिले गेले पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली. विशेष म्हणजे याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. सरकारने गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन ची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असे आश्वासन दिले. 👉🏻सरकारने कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत देण्याचा जीआर काढला. दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे. पण एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती मदत मिळू शकते? १० हजार की २० हजार रुपये? याची माहीती जीआरमध्ये देण्यात आली नाही. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे २ हेक्टर सोयाबीन आणि २ हेक्टर कापूस असेल तर त्या शेतकऱ्याला ४ हेक्टरसाठी मदत मिळणार की केवळ २ हेक्टरसाठी मिळणार? म्हणजेच या शेतकऱ्यांना १० हजार मिळणार की २० हजार? याचा उल्लेख जीआरमध्ये नाही. 👉🏻पण जर एखाद्या शेतकऱ्याने कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीके घेतली तर त्या शेतकऱ्याला सोयाबीनसाठी २ हेक्टर आणि कापसासाठी २ हेक्टर मदत मिळणार आहे. म्हणजेच २० हजार रुपये मिळतील. पण समजा एखाद्याने सोयाबीन २ हेक्टर आणि कापूस १ हेक्टर घेतला असेल किंवा कापूस २ हेक्टर किंवा सोयाबीन १ हेक्टर घेतले असेल तर त्या शेतकऱ्याला १५ हजार रुपये मिळतील, असे कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 👉🏻ही मदत मिळण्यासाठी सरकारने काही अटीही घातल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी खरिप हंगाम २०२३ मध्ये कापूस आणि सोयाबीन पीक घेतले होते आणि त्याची नोंदणी ई-पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर केली होती तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी खरिप हंगाम २०२३ मध्ये आपल्या सोयाबीन आणि कापूस पिकाची ई-पीक पाहणी केलेली असेल, तरच पात्र ठरतील. तसेच शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीवर जेवढ्या क्षेत्राची नोंदणी केली आहे तेवढ्याच पिकासाठी ही मदत मिळणार आहे. 👉🏻संदर्भ :Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
0
इतर लेख