AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नियोजन कोथिंबीर लागवडीचे!
गुरु ज्ञानAgrostar
नियोजन कोथिंबीर लागवडीचे!
🌱कोथिंबीर हे कमी वेळात येणारे आणि चांगला आर्थिक नफा मिळवून देणारे पीक आहे. या पिकाची लागवड तीनही हंगामध्ये केली जाते. उन्हाळी हंगामात कोथिंबिरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी जास्त असते. या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, काळी व निचऱ्याची जमीन निवडावी. पेरणीपेक्षा टोकण पद्धतीने लागवड केल्यास बियाणे कमी लागते. पेरणीपूर्वी बियाणे खरबडीत भागावर घासून घ्यावे. त्यानंतर बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून लागवड करावी. बी पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावेत. वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीनंतर बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे. त्यांनतर जमिनीच्या प्रकारानुसार आणि वाढत्या तापमानानुसार कोथिंबीर पिकास नियमित 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावे. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
9