गुरु ज्ञानAgroStar
नियोजन उडीद, मूग पिकाच्या पेरणीचे!
🌱उडीद, मूग पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी पिकाची पेरणी ही 15 जुन ते 15 जुलै पर्यंत करावी.
पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. पेरणी साठी 2 ओळींमधील
अंतर 30 सेमी आणि दोन झाडांमधील अंतर 10 सेमी ठेवावे. तसेच पेरणी साठी एकरी 4 ते 5 किलो
बियाणे प्रति एकरी वापरावे. सुरुवातीला पिकाच्या अन्नद्रव्यांची गरज पुर्ण होऊन पिकाच्या जोमदार
वाढीसाठी पेरणी करतेवेळी एकरी 50 किलो डीएपी, 25 किलो पोटॅश खतासोबत संचार 10 किलो
जमिनीतून वापरावे.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.