AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
द्राक्षबागांची ऑनलाइन नोंदणी साडेचार हजारापेक्षा जास्त
कृषि वार्तापुढारी
द्राक्षबागांची ऑनलाइन नोंदणी साडेचार हजारापेक्षा जास्त
पुणे – राज्यात निर्यातक्षम द्राक्षबागांची संख्या वाढावी व निर्यातीमधील वाटा वाढण्यासाठी अपेडाच्या ग्रेपनेट या ऑनलाइन प्रणालीवर द्राक्षबागांची नोंद महत्वाची आहे. नोव्हेंबरअखेर बागा नोदींची नियमित मुदत देण्यात आलेली असून गुरूवारअखेर ४ हजार ६६३ द्राक्ष बागांच्या नोंदी झाल्याची माहिती कृषी आयुक्तावरील निर्यात कक्षाचे प्रमुख व तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांनी दिली.
शेतकऱ्यांनी नोव्हेंबरअखेरीपर्यंत जास्त द्राक्षबागांची नोंद करण्याचे आवाहन केलेले होते. गतवर्षी विक्रमी म्हणजे ४३ हजार बागांची नोंद ग्रेपनेटवर झालेली होती. काही बागांचे नूतनीकरण तर काही नव्याने नोंदल्या जातात. पंचनाम्यांचे कामही उशिरा पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता बागा नोंद वाढण्याची अपेक्षा आहे. १ डिसेंबर ते डिसेंबर महिनाअखेर होणाऱ्या बागा नोंदीस पन्नास रूपये उशिराची फीची आकारणी केली जाते. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी द्राक्षबागाची नोंद करण्याचे आवाहन त्यांनी केले. संदर्भ – पुढारी, ३० नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0
इतर लेख