AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दोन वर्षात मिळवा 2 लाख 32 हजार रुपये
योजना व अनुदानAgroStar
दोन वर्षात मिळवा 2 लाख 32 हजार रुपये
👉🏼सरकारने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक छोट्या-मोठ्या बचत योजना सुरू करून नागरिकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. याचबरोबर, महिलांसाठीही अनेक बचत योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना सरकारद्वारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनच चालवल्या जातात. 👉🏼अशाच प्रकारे, सरकारने एक सरकारी बचत योजना सुरू केली आहे जी “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना” नावाने ओळखली जाते. या बचत योजनेत, फक्त महिलांनाच पोस्ट ऑफिसद्वारे गुंतवणूक करता येते. 👉🏼खाते उघडण्याची प्रक्रिया: - संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्या. - महिला सन्मान बचत पत्र योजनेची माहिती अधिकाऱ्यांकडून घ्या. - खाते उघडण्यासाठी अर्ज फॉर्म मिळवा. - फॉर्म काळजीपूर्वक भरा. - आवश्यक कागदपत्रे जोडा. - भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे बँकेत जमा करा. - बँक तुमचे खाते उघडेल. - तुम्ही तुमच्या खात्यात रक्कम जमा करू शकता. - रक्कम जमा केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल. - बँक तुम्हाला तुमचे खाते आणि शिल्लक तपासण्यासाठी पासबुक देईल. 👉🏼संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
0
इतर लेख