AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देवगड हापूस आंबा उत्पन्न वाढवाढीचा सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
देवगड हापूस आंबा उत्पन्न वाढवाढीचा सल्ला!
➡️देवगड तालुका स्थानिक पातळीवर पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो. ➡️देवगड तालुक्यातील शुद्ध हापूस आंब्याच्या लागवडीमुळे संपूर्ण तालुक्याचा विकास झाला आहे. येथे पिकलेला आंबा हा त्याचा सुगंध, गुळगुळीत पातळ त्वचा आणि दाट केशरी गर यांसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अन्यत्र पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. ➡️देवगड येथील हापूस आंबा हा ४५,००० एकर क्षेत्रावर पिकविला जातो आणि वर्षभरात याचे चांगल्या वातावरणात उत्पादनामध्ये सुमारे ५०,००० टन उत्पादन होते. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड नावाच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भारतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. ➡️देवगड हापुस आंब्याची फळधारणा व उत्पन्न वाढवण्यासाठी दोन वेळा २ % युरीया + २० PPM NAA घटक असलेले नागमृता + 50 PPM सुक्ष्म अन्नद्रव्य किंवा २ % युरीया + ५ PPM ट्रायकंटॅनॉल घटक असलेले पीक बूस्टर + ५० PPM सुक्ष्म अन्नद्रव्य हे वाटाण्याच्या दाण्याच्या आकाराचे आंबे लागल्यानंतर आणि त्यानंतर १० दिवसांनी फवारावे. ➡️आंब्यामध्ये फळांचा कळ्या तयार होण्यापुर्वी ९० ते १२० दिवस अगोदर (१५ जुलै ते १५ ऑगस्ट) पँक्लोब्युट्रॉझॉल ५ ग्रँम प्रती झाड जमिनीमध्ये द्यावे. त्यासाठी २० मि.ली. कल्टार घेऊन त्यात ३ लिटर पाणी घ्यावे. आणि ३० छिद्रामध्ये ३ ते ४ इंच खोल झाडाच्या बुंध्याशी खते दिलेल्याचा आतील बाजूस द्यावीत. ➡️हापुस आंब्यांच्या फांद्यांची एकसारखी वाढ होण्यासाठी तसेच एकसारखा मोहोर व फळे येण्यासाठी आणि तुडतुड्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक 3 वर्षानंतर विश्रांतीच्या काळामध्ये (ऑक्टो) साधी छाटणी करून घ्यावी. (50 cm) शेंड्याकडुन आडव्या फांद्यांची. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
14
4