योजना व अनुदानAgroStar
दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप!
➡️शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना शासनाच्या माध्यमातून राबविल्या जातात व अशाच प्रकारची एक योजना जी शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती नव बौद्ध या प्रवर्गातील नागरिकांसाठी दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप केले जाणार आहे व याच योजनेचे नाव दुधाळ जनावर गट पुरवठा योजना असे आहे
➡️योजनेच्या माध्यमातून दोन दुधाळ गाई अथवा म्हशी घेण्यासाठी 75 टक्के एवढे अनुदान दिले जातील, तसेच या योजनेअंतर्गत एक हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.
➡️योजनेअंतर्गत मिळणारे लाभ:
दोन दुधाळ गाई किंवा म्हशींचा पुरवठा (संकरित गाय - एच.एफ. किंवा जर्सी, म्हैस - मुऱ्हा किंवा जाफराबादी, देशी गाय - गीर, साहिवाल, लाल सिंधी, राठी, थारपारकर, देवनी, लाल कंधारी, गवळाऊ आणि डांगी)
➡️योजनेसाठी पात्रता:
लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध किंवा जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
लाभार्थीचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
लाभार्थ्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणे आवश्यक आहे.
➡️लाभार्थ्यांची निवड:
लाभार्थ्यांची निवड जिल्हा पशुसंवर्न उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती करते.निवड करताना महिला आणि दिव्यांगांना प्राधान्य दिले जाते.
➡️आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- 7/12 आणि 8-अ उतारे
- शिधापत्रिका (रेशनकार्ड)
- राष्ट्रीयकृत बँक खाते पासबक
- अर्जदाराचे छायाचित्र
- अनुसूचित जाती/जमाती प्रमाणपत्र
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- दिव्यांग प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
➡️संदर्भ: Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.