पशुपालनAgroStar
दुधउत्पादन वाढीसाठी आहारात वाढवा पोषणतत्वे!
👉🏻संकरीत जनावरांचे दुध हे देशी जनावरांपेक्षा जास्त असते. दुध देण्याच्या सुरवातीच्या सहा आठवड्यामध्ये दुध तयार करण्यासाठी लागणाऱ्या पोषण तत्वाचे प्रमाण हे आहारातून मिळणाऱ्या पोषण तत्वाच्या प्रमाणापेक्षा जास्त असते कारण या काळात जनावारंचा आहार कमी असतो. कमी आहारातून त्यांची शरीराची पोषण तत्वांची गरज पूर्ण होत नाही म्हणून या काळात दुध उत्पादनासाठी गायी म्हशीच्या शरीरात साठवलेल्या पोषणतत्वाचा वापर केला जातो. त्यामुळे या काळात जनावरांचे दिवसेंदिवस वजन कमी होते व जनावर अशक्त होते त्यामुळे पुढील दुध उत्पादन कमी होते
👉🏻 दुध देण्याच्या सुरवातीच्या सहा आठवडे कालावाधीमध्ये कमी आहारातून पोषणतत्वाची गरज पूर्ण होण्यासाठी आहारातील पोषणतत्वाची घनता वाढवणे आवश्यक आहे.
👉🏻 पोषण तत्वाची घनता वाढवण्यासाठी आहारात द्विदल चारा पिकांचा वापर करणे संरक्षित प्रथिने यांचा वापर करणे फायदेशीर ठरते .
👉🏻जास्तीचा आहार :
- गाय म्हैस विन्याच्या अगोदर दोन आठवडे खुराकाचे प्रमाण दैनंदिन मात्रे पेक्षा वाढवणे यालाच जास्तीचा आहार म्हणतात.
- दैनंदिन मात्रे पेक्षा सुरवातीला ५०० ग्राम प्रतिदिन याप्रमाणे खुराकाच्या प्रमाणात वाढ करावी नंतर प्रतिदिन ५०० ते १०००ग्राम प्रती १०० किलो वजनास याप्रमाणे खुराकाचे प्रमाण ठेवावे.
- जास्त खुराकाच्या प्रमाणामुळे दुध उत्पादनात जास्तीत जास्त वाढ होते.
- दुधाळ जनावरांना त्यांच्या वजनाप्रमाणे दुध देण्याचे प्रमाण व दुधातील स्निग्धांश चे प्रमाण यानुसार आहारामध्ये हिरवा चारा एकदल आणि द्विदल वाळलेला चारा आणि खुराकाचा वापर करावा.
👉🏻संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.