AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर लागवडीचे नियोजन!
गुरु ज्ञानAgroStar
तूर लागवडीचे नियोजन!
🌱खरीप हंगामात तूर पिकाची लागवड 15 जुन ते 15 जुलै पर्यंत करणे आवश्यक आहे. लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पाणी धरून ठेवणाऱ्या पाणथळ जमिनीत लागवड टाळावी जेणेकरून मर रोग नियंत्रणासाठी मदत होईल. बियाची चांगली उगवण होण्यासाठी लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक घेणे शक्य आहे. बी टोबून लावल्यास एकरी 2 ते3 किलो बियाणे पुरेसे आहे. लागवड करताना दोन ओळींमध्ये 3 ते 4 फुट अंतर आणि दोन बियांमध्ये 1 फुट अंतर ठेवावे. लागवड करण्याअगोदर सरीमध्ये खताची योग्य मात्रा देऊन लागवड करावी. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
1
इतर लेख