अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर बीजप्रक्रिया व पेरणीचे नियोजन!
सध्या बऱ्याच शेतकरी बांधवांची तूर पिकाची लगबग सुरु असेल तर आज आपण तूर पीक लागवडीबाबत थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
➡️ तूर पिकाच्या टोबून लागवड करण्यासाठी प्रति एकरी २ ते ३ किलो बियाणे लागतात.
➡️ लागवड करताना २ ते ३ फूट ओळीतील अंतर तर दोन रोपांतील अंतर १ फूट राखावे.
➡️ पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेंझीम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व २५ ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून बीजप्रक्रिया करावी.
➡️ तसेच लागवडीवेळी १८:४६:०० @५० किलो प्रति एकरी खतमात्रा द्यावी.
संबंधित उत्पादने
AGS-S-2620
AGS-CP-573
AGS-CP-152
AGS-CP-702
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.