कृषि वार्ताAgroStar
तूर पिकातील खोड करपा नियंत्रण
👉🏻तूर पीक हे सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये असून यावर खोड करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामुळे पानावर ओलसर चट्टे, खोडावर जमिनीलगत, जमिनीपासून काही इंच अंतरावर तपकिरी चट्टे आढळतात.
नंतर हे चट्टे वाढत जाऊन खोडाभोवती खोलगट भाग तयार होतो. हे चट्टे वाढत जाऊन झाडाच्या मुख्य बुंध्याला वेढतात, त्यामुळे झाड कमकुवत होऊन त्या ठिकाणी चटकन तुटते. या खोडाच्या चट्ट्याचा उभा छेद घेतल्यास खोडाचा आतील भाग तपकिरी काळा पडल्याचे दिसते.
बरेचदा खोडावर 2 ते 3 मिलिमीटर खोल व 2 ते 4 सेंटिमीटर लांब भेगा पडलेल्या दिसतात. या रोगामध्ये झाडे लवकर वाळतात.
👉🏻यावर उपाययोजना म्हणून रोग दिसताच खोडावर व फांद्यावर मेटॅलॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% WP घटक असणारे मेटल ग्रो बुरशीनाशक @2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
👉🏻संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.