AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर उत्पादन वाढीसाठी शेंडा खुडणी फायदेशीर !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर उत्पादन वाढीसाठी शेंडा खुडणी फायदेशीर !
🌱तुरीचे उत्पादन हे खरीप हंगामात घेतले जाते. तुरीची पेरणी साधारण उडीद, मूग, सोयाबीन यामध्ये आंतरपिक म्हणूनच केली जाते. पेरणीनंतर साधारण ४० ते ४५ दिवसांनी पहिली शेंडी खुडणी करावी, दुसरी शेंडा खुडणी ६० ते ६५ दिवसांनी आणि तिसरी शेंडा खुडणी ८०-८५ दिवसांनी करावी जेणेकरून अधिक फुटवे व उपफांद्या येतात. शेंडा दोन ते तीन इंच खुडावा याकरिता शेतकऱ्य़ांनी हातानी खुडणी करावी. खुडणी झाल्यानंतर स्फुरद अन्नद्राव्य दिल्यास फुलोरा आणि शेंगाची लागवणही होऊन उत्पादनात चांगली वाढ होते. 🌱 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
5