गुरु ज्ञानAgrostar
तीळ पिकातील पर्णगुच्छ
👉तीळ पिकामध्ये येणारा पर्णगुच्छ हा विषाणूजन्य रोग असून मायकोप्लाझ्मा या विषाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने तुडतुडत्यांमार्फत होतो. पीक फुलोऱ्यात येईपर्यंत या रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, पीक फुलोऱ्यात आल्यानंतर फुलांचे योग्य सेटिंग न होता त्याचे लहान लहान पानांत रूपांतर होते व त्या पानांचा गुच्छ तयार होतो, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.
👉या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी तुडतुडे आणि रसशोषक किडींचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे किल एक्स कीटकनाशक @0.75 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगग्रस्त झाडे किंवा त्यांचे संक्रमित भाग त्वरित गोळा करून नष्ट करावेत, जेणेकरून रोगाचा प्रसार कमी होईल.
👉तसेच पीक रोगमुक्त ठेवण्यासाठी सुरुवातीपासूनच तुडतुड्यांचे नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. नियमित पिकाची निरीक्षणे घेऊन प्रारंभीच प्रतिबंधात्मक फवारणी केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो आणि पीक निरोगी राहते. योग्य व्यवस्थापनाद्वारे तीळ पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारता येईल.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.