गुरु ज्ञानAgrostar
डाळिंब पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी आच्छादनाचे महत्व
👉🏻डाळिंब हे उष्ण व कोरड्या हवामानात वाढणारे पीक असून, अतिउष्ण तापमानामुळे झाडांचे पाणी उत्सर्जन व भूपृष्ठावरून होणारे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. ठिबक सिंचनाने ओलीत पद्धतीतील पाण्याचा ऱ्हास टाळता येतो, परंतु बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी आच्छादन आवश्यक आहे.
👉🏻आच्छादनाचे प्रकार:
1. प्लास्टिक आच्छादन: काळ्या रंगाचे मल्चिंग पाण्याची बचत, तण नियंत्रण व उष्णतेचे नियंत्रण करते, तर चंदेरी मल्चिंग जमिनीचे तापमान कमी ठेवते.
2. सेंद्रिय आच्छादन: वाळलेल्या पानांचा पालापाचोळा, गवत, उसाचे पाचट, धानाचा कोंडा, लाकडाचा भुस्सा व पिकांचे अवशेष यांचा वापर केला जातो.
👉🏻फायदे:
- तण नियंत्रण होते.
- पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन उत्पादन वाढते.
- जमिनीच्या तापमानात संतुलन राहते व मुळांची कार्यक्षमता सुधारते.
- जमिनीतील सेंद्रिय कर्ब, अन्नद्रव्यांची उपलब्धता व सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढते.
- फळे तडकण्याचे प्रमाण कमी होते व उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
👉🏻आच्छादनाचा योग्य वापर केल्यास डाळिंब पिकाचा उत्पादन खर्च कमी होऊन गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.