AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटोतील सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कसा ओळखावा?
गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटोतील सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कसा ओळखावा?
🌱टोमॅटो पिकामध्ये सूत्रकृमी सुईसारख्या अतिसूक्ष्म व तीक्ष्ण अवयवाने मुळांतील अन्नरस शोषून घेतात. अन्नरस शोषताना सूत्रकृमी त्यांच्या पोटातील पाचक रस मुळांमध्ये सोडतात त्यामुळे मुळांवर गाठी तयार झाल्याप्रमाणे दिसते. त्यामुळे मुळांच्या पाणी आणि अन्न शोषून क्रियेवर परिणाम होतो.झाडाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, अकाली फळगळ होते. सूत्रकृमींनी इजा केल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. परिणामी झाड मरते. यावर उपाययोजना म्हणून पिकांची फेरपालट करावी. सूत्रकृमीग्रस्त पिकांमध्ये झेंडूसारखे मिश्रपीक घ्यावे किंवा संपूर्ण शेतामध्ये झेंडूची लागवड करून नंतर दुसरे पीक घ्यावे. प्रतिबंधात्मक म्हणून खतांच्या सुरुवातीच्या डोसमध्ये निंबोळी पेंड चा वापर करावा. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0
इतर लेख