AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटोतील कॅटफेस समस्येवर उपाययोजना!
गुरु ज्ञानAgrostar
टोमॅटोतील कॅटफेस समस्येवर उपाययोजना!
🍃या विकृतीमध्ये टोमॅटोच्या फळांचा आकार मांजरीच्या तोंडासारखा होतो. याची कारणे पुढीलप्रमाणे - 🍃फुले लागण्याच्या अवस्थेत थंड व ढगाळ वातावरण, रात्रीचे तापमान जास्त काळ कमी राहिल्यास फुलांमध्ये परागीभवनास अडथळा निर्माण करते. 🍃फळधारणा अवस्थेत थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव, काही प्रमाणात २, ४ डी सारख्या तणनाशकाची इंज्युरी यांसारखी कारणे या समस्येस कारणीभूत ठरतात. 🍃यावर उपाय म्हणून योग्य हंगामात योग्य वाणांची लागवड करावी. संपूर्ण झाडांना योग्य सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.तसेच वेळीच कीड नियंत्रित ठेवावी. 🍃संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख