AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgrostar India
टोमॅटो पिकासाठी क्रॉप कव्हरचे फायदे
👉उन्हाळ्याच्या दिवसात टोमॅटो पिकावर तापमान वाढ, मावा कीड आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. अशा परिस्थितीत पीक वाचवण्यासाठी ‘क्रॉप कव्हर’चा वापर फायदेशीर ठरतो. क्रॉप कव्हर म्हणजे हलकं, पारदर्शक जाळीसारखं संरक्षण कवच, जे रोपांवर आच्छादन म्हणून वापरलं जातं. 👉याचा उपयोग करून आपण उन्हाची तीव्रता कमी करू शकतो, ज्यामुळे झाडांची वाढ चांगली होते आणि फुल व सेटिंग टिकून राहते. मावा व इतर कीड टोमॅटो पिकावर बसू शकत नाहीत, त्यामुळे व्हायरसचा धोका ही कमी होतो. 👉उन्हाळ्यात क्रॉप कव्हरचा वापर केल्याने पीक निरोगी राहतं आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. मात्र, पावसाळ्यात हे कव्हर टाळावं, कारण पाण्याचा अडथळा होतो आणि रोगाचा धोका वाढतो. 👉याचबरोबर, या व्हिडिओमध्ये क्रॉप कव्हर कसं वापरावं आणि त्याचे फायदे सविस्तरपणे समजावून सांगितले आहेत. हे मार्गदर्शन नक्की पाहा आणि आपल्या पिकाचं संरक्षण करा! ✅ 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
0
0
इतर लेख