AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील समस्या तिरंगा
गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटो पिकातील समस्या तिरंगा
👉टोमॅटो पिकामध्ये फळ परिपक्व होण्याच्या टप्प्यावर फळांवर हिरवट, पांढऱ्या आणि लालसर रंगछटा दिसून येते, यालाच सामान्यतः तिरंगा समस्या असे म्हटले जाते. ही समस्या बऱ्याच वेळा अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे आणि हवामानातील बदलांमुळे उद्भवते. विशेषतः पोटॅश आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता, मुळांची अन्नद्रव्ये घेण्याची शक्ती कमी होणे, अनियमित पाणी व्यवस्थापन, तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे फळांची वाढ आणि रंग परिवर्तन योग्य प्रकारे होत नाही. 👉ही समस्या झाल्यानंतर फळांचे दर्जा आणि उत्पादन दोन्ही घटते, त्यामुळे वेळेत प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. नत्रयुक्त खतांचा अति वापर टाळून पिकाला आवश्यक ते पोटॅश, कॅल्शियम आणि बोरॉन युक्त घटक योग्य प्रमाणात द्यावेत. 👉उपाययोजनेंतर्गत: - कॅल्शियम नायट्रेट @ ५ किलो प्रति एकर - न्युट्री प्रो बोरॉन (२०% घटक) @ ५०० ग्रॅम प्रति एकर हे दोन्ही घटक ठिबक सिंचनाद्वारे द्यावेत. 👉यामुळे फळांचा रंग, चव आणि गुणवत्ता सुधारते, तसेच तिरंगा समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
0
0
इतर लेख