AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील फळांच्या गुणवत्तेसाठी उपाययोजना
गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटो पिकातील फळांच्या गुणवत्तेसाठी उपाययोजना
टोमॅटो पिकामध्ये फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जर पाणी व्यवस्थापन योग्यरीत्या केले नाही तर फळांना तडे येऊ शकतात, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता कमी होते. 👉फळांना तडे येण्याचे कारणे आणि प्रतिबंध - जमिनीतील ओलावा कमी-जास्त झाल्यामुळे फळांना तडे पडतात. - जमिनीच्या वाफसा अवस्थेनुसार योग्य पाणी नियोजन करावे. - सेंद्रिय खतांचा वापर करावा, त्यामुळे मृदेत ओलावा टिकून राहतो. 👉टोमॅटो पिकातील पोषण व्यवस्थापन - फळांच्या विकासासाठी फळ वाढीच्या अवस्थेत 13:00:45 विद्राव्ये खत 3 ग्रॅम प्रति लिटर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 2 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. - ठिबक सिंचनाद्वारे कॅल्शिअम नायट्रेट 5 किलो आणि बोरॉन 1 किलो प्रति एकर वेगवेगळ्या वेळी सोडावे. 👉नियमित निरीक्षण आवश्यक टोमॅटो पिकाच्या नियमित निगराणीमुळे योग्य वेळी कीड आणि रोग व्यवस्थापन करता येते, जेणेकरून उत्पादनाचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारता येईल. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख