AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो कुकुम्बर मोझॅक व्हायरस!
गुरु ज्ञानAgrostar
टोमॅटो कुकुम्बर मोझॅक व्हायरस!
👉🏼टोमॅटो वरील कुकुम्बर मोझॅक व्हायरस रोगाची लक्षणे आणि प्रसार - 👉🏼संपूर्ण महाराष्ट्रात टोमॅटो पिकाची संकरित जातींची वर्षभर लागवड केली जाते. परंतु सध्याच्या सततच्या वातावरणातील बदलावांमुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनाची गुणवत्ता खालावून आर्थिक नुकसान होत आहे. 👉🏼टोमॅटो मध्ये अलीकडच्या काळात पाहिल तर टूटा अब्सुलूटा हि कीड आणि विविध विषाणूजन्य रोगांचा उद्रेक टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या भागात झालेला आहे. टोमॅटो पिकात लीफ कर्ल व्हायरस, टोस्पो व्हायरस, कुकुम्बर मोझॅक व्हायरस, क्लोरोसिस व्हायरस अश्या विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. 👉🏼मागील दोन वर्षांपासून कुकुम्बर मोझॅक व्हायरस या रोगाने पुणे, नाशिक, अहमदनगर व इतर भागात टोमॅटो पिकाचे पूर्णपणे नुकसान केले आहे. त्यामुळे यापुढे टोमॅटो पिकाचे उत्पादन घेण्यापूर्वी रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे समजून घेऊन सुरुवातीपासून एकात्मिक पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे 👉🏼रोगाची लक्षणे: रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर पाने फिक्कट हिरवी होऊन आकाराने लहान होतात. अधिक प्रादुर्भावात फांद्यांचा आकार बुटाच्या लेसप्रमाणे किंवा दोरीसारखा होतो. फळे पिवळसर अथवा रंगहीन होऊन लवकर पक्व होत नाही तसेच आकाराने लहान राहतात. काही ठिकाणी फळे आतून काळी पडून सडल्याचे आढळून आले आहे. 👉🏼रोगाचा प्रसार - या रोगाचा प्रसार मावा किडीमार्फत होतो. हि कीड नोव्हेंबर ते एप्रिल या काळात जास्त सक्रिय असते. यजमान पिके - काकडी, शेंगवर्गीय पिके, बटाटा, पपई, केळी, मिरची 👉🏼संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
1
इतर लेख