AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो: करपा रोग आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटो: करपा रोग आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
👉सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे टोमॅटो पिकामध्ये करपा रोग आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो आहे. करपा रोगामुळे पानांवर तपकिरी ठिपके दिसतात, ज्यामुळे पाने वाळतात आणि गळतात. फळ पोखरणारी अळी फळांच्या आतील भाग पोखरते, ज्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. 👉या समस्येचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी, कीड आणि रोग व्यवस्थापन उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी अझोक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% SC घटक असलेले रोझताम बुरशीनाशक @ 240 मिली आणि क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असणारे रॅपिजन 18.50% कीटकनाशक @ 60 मिली प्रति एकर फवारावे. यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण होऊ शकते. 👉फवारणी करताना योग्य प्रमाणात कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरावे, तसेच पिकामध्ये नियमितपणे निरीक्षण करावे. वेळोवेळी केलेल्या उपाययोजना पिकाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात आणि उत्पादनात वाढ होते. 👉 स्रोत:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख