AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टरबूज आणि कलिंगडातील कीड ओळखा आणि तिचे नियंत्रण करा.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टरबूज आणि कलिंगडातील कीड ओळखा आणि तिचे नियंत्रण करा.
अनेक शेतकऱ्यांनी या हंगामात टरबूज आणि कलिंगडाची लागवड केली आहे. फळ माशी ही या पिकातील मुख्य कीड आहे. तसेच नाग अळीचा प्रादुर्भाव सुद्धा दिसतो. या किडी ओळखूया आणि त्यांच्यामुळे होणारे नुकसान टाळू या. 1. फळ माशी: या किटकाची मादी फळधारणेच्या अवस्थेपासून ते फळ पक्व होईपर्यंत फळाच्या सालीच्या आत अंडी घालायला सुरूवात करते अंड्यातून बाहेर येणारा कीटक रंगाने पिवळसर पांढरा असतो आणि त्याला डोके नसते. तो फळ पोखरतो. जर फळ फुलोऱ्याच्या अवस्थेत असेल, तर मादी फूल गळून पडते. जर पक्व फळांचे नुकसान झाले तर, अशी फळे सडू लागतात आणि शेवटी गळून पडतात. जिथे अंडी घातलेली असतात तिथून फळातून चिकट द्रव बाहेर येतो. हा द्रव वाळतो आणि त्याचे तपकिरी रंगाच्या डिंकात रूपांतर होते. यामुळे, फळावर डाग पडतात आणि फळाची गुणवत्ता घसरते. ही कीड गरम हवेत सक्रिय होते आणि हिवाळ्यात निष्क्रिय होते. एकात्मिक व्यवस्थापन • प्रादुर्भावग्रस्त फळे आणि डाग पडलेली फळे दररोज गोळा केली पाहिजेत आणि 1.5 ते 2 फूट खोल खड्ड्यात त्यावर कीटकनाशक फवारून मातीत गाडली पाहिजेत. • बाग स्वच्छ ठेवावी आणि पिक काढणीनंतर, खोल नांगरट करावी म्हणजे कोश नष्ट होतील. • प्रौढ फळमाशीच्या नियंत्रणासाठी, 450 ग्रॅम गूळ 10 लिटर पाण्यात घालून मिश्रण तयार करा आणि ते 24 तास तसेच ठेवा. त्यानंतर त्यात डायक्लोरव्हॉस 76 EC 5 मिली घाला आणि फुले येण्याच्या काळात आठवड्यातून एकदा वेलीेपर्यंत पोचण्यासाठी मोठा स्प्रिंकलर वापरून फवारा. • टरबूज आणि कलिंगडात फुले येण्यास सुरूवात झाली की नर फळमाशांना आकर्षित करण्यासाठी, आमिष असलेले 10-15 फळमाशी सापळे प्रती हेक्टर लावा. बक्ट्रोसेरा कुकुर्बिटी या नावाच्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी हे सापळे रोपावर 1 मीटर उंचीवर लावा.
2. नाग अळी अंड्यातून बाहेर येणारी अळी, पानांच्या दोन थरांच्या मध्ये राहते आणि पानाचा हिरवा भाग नागमोडी पद्धतीने खाते. त्यामुळे, पानावर नागमोडी रेषा दिसू लागतात आणि रोपाची वाढ थांबते. जास्त प्रादुर्भाव असेल तर, पान वाळते. स्पिनोसॅड 45% SC 3 मिली किंवा डायमिथोएट 30% EC 10 मिली 10 लिटर पाण्यात घालून फवारा. लाल आणि काळे भुंगेरे : अंड्यातून बाहेर येणारा कीटक, रोपाचे खोड आणि मुळे यांचे नुकसान करतो. तो जमिनीला टेकलेली फळे सुद्धा खातो. प्रौढ कीटक जेव्हा कळ्या आणि फुले खातो, तेव्हा वेलीची वाढ कमी होते. कधीकधी किटकाने पाने वर्तुळाकार खाल्ली आहेत, असेही आढळते. एकात्मिक व्यवस्थापन • पिक काढणी नंतर, जमीन खोल नांगरावी. • 1.5% (25 किग्रॅ/हेक्टर) क़्विनालफॉस पावडर अशा प्रकारे फवारावी की रोपावर तसेच मातीवर पडेल. डायक्लोरव्हॉस 76% EC 7 मिली 10 लिटर पाण्यात घाला आणि वेलींवर फवारा. तसेच रोपाच्या खोडाभोवती आणि मातीत घाला म्हणजे ते मुळांपर्यंत पोचेल. 4. फोड भुंगेरे: भुंगेरे फुलांच्या पाकळ्या आणि पराग खातात, त्यामुळे उत्पादन कमी होते. 1.5% (25 किग्रॅ/हेक्टर) क़्विनालफॉस पावडर फवारून सुद्धा कीटकांचे नियंत्रण करता येते. त्याशिवाय, या पिकात मावा किडी, तुडतुडे, पांढरी माशी आणि नागअळीचा प्रादुर्भाव सुद्धा दिसतो. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
305
5
इतर लेख