AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जाणून घ्या,१२:६१:०० या विद्राव्य खताचे पिकातील महत्व!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
जाणून घ्या,१२:६१:०० या विद्राव्य खताचे पिकातील महत्व!
यामध्ये कोणते घटक असतात? नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते? 👉 हे मोनोअमोनियम फॉस्फेट युक्त असते. 👉 नायट्रोजन कमी, पण फॉस्फरस भरपूर. 👉 पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त. 👉 अधिक फुल व फळधारणेसाठी उत्तम. 👉 पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत असल्याने पिकांना चांगल्या प्रकारे लागू पडते परिणामी उत्पादनात वाढ होते. 👉 पिकाची शाखीय वाढ चांगली झाल्यानंतर म्हणजेच पिकाच्या दुसऱ्या टप्प्यात याचा वापर करावा. यामुळे पिकात अधिक फुलधारणा होण्यास मदत होते. याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? 👉 फुलांची गळ कमी करते आणि अधिक फलधारणा करून शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पादन आणि वाढीव उत्पन्न मिळते. कोणत्या पिकांसाठी वापर करावा? 👉 ठिबक: द्राक्षे, डाळिंब, केळी, कांदा, मिरची, वांगी, गवार, टोमॅटो, कांदा, ऊस,कलिंगड, खरबूज, फुलशेती. 👉 फवारणी: सर्व पिके 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
148
19
इतर लेख