AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जाणून घ्या ! बजेट फ्रेंडली बाइक बद्दल !
ऑटोमोबाईलAgrostar
जाणून घ्या ! बजेट फ्रेंडली बाइक बद्दल !
🏍️हिरो स्प्लेंडर प्लस ही देशातील सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. या बाईकमध्ये 97cc चे इंजिन देण्यात आले आहे. भारतात बाईक वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच कारणाने देशात दिवसेंदिवस बाईकची मागणी वाढत चालली आहे. जर तुम्हालाही चांगली पण बजेटफ्रेंडली बाईक घ्यायची असेल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही बाईक्सचे ऑप्शन्स सांगणार आहोत. या बाईकमध्ये चांगले मायलेज आणि पॉवरफुल इंजिनसह दमदार फिचर्स असतील. बाजारात एक लाख रुपयांच्या रेंजमध्ये कोणत्या बाईक उपलब्ध आहेत, ते पाहा. 🏍️हिरो स्प्लेंडर प्लस : हिरो स्प्लेंडर प्लस ही देशातील सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. या बाईकमध्ये 97cc चे इंजिन देण्यात आले आहे. यात 9.8 लीटरची इंधन टॅंक आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 70,658 रुपये आहे. ही बाईक 60 kmpl पर्यंत मायलेज देते. 🏍️बजाज पल्सर NS125 : बजाजची ही बाईक देशात खूप लोकप्रिय आहे. या बाईकला पॉवर करण्यासाठी 124.45cc इंजिन वापरण्यात आले आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 45 किमी धावू शकते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 99,770 रुपये आहे. 🏍️होंडा युनिकॉर्न : होंडाच्या या बाईकमधूनही मजबूत मायलेज मिळू शकते. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 60 किमी धावू शकते. त्याला या बाईकमध्ये 160 सीसी मिळते. या आलिशान बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.01 लाख रुपये आहे. 🏍️जॉय ई-बाईक मॉन्स्टर : जर तुम्हाला स्पोर्टी बाईक घ्यायची असेल तर तुमची इच्छा एक लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीतही पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्ही जॉयची ई-मॉन्स्टर बाईक निवडू शकता. ही इलेक्ट्रिक बाईक एका चार्जवर 75 किमी चालवता येते. या इलेक्ट्रिक बाईकची एक्स-शोरूम किंमत 94,000 आहे. 🏍️यामाहा FZ Fi : यामाहाची ही बाईक तिच्या दमदार कामगिरीसाठी आणि जबरदस्त स्पोर्टी लूकसाठी प्रसिद्ध आहे. या बाईकमध्ये 149cc इंजिन वापरण्यात आले आहे. हे 45 kmpl पर्यंत मायलेज देते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.01 लाख रुपये आहे. 🏍️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
2