AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जाणून घ्या जोजोबा या नवीन पिकाबद्दल!
व्यवसाय कल्पनाkrishi jagran
जाणून घ्या जोजोबा या नवीन पिकाबद्दल!
➡️जोजोबा वनस्पती सदाहरीत व झुडूप व जंगली पीक आहे. या पिकात पानगळ होत नाही. जोजोबाचे मुळे पाण्यासाठी खोलवर पसरतात. पाणी शोषण करून घेतात. या वनस्पतीत घेतलेले पाणी साठवून ठेवून पाहिजे त्यावेळी वापर करण्याचा अनोखा गुण असल्याचे जगभरच्या संशोधकांना दिसून आले आहे. एकदा लागवड केलेले जोजोबाचे झाड १५० ते २०० वर्ष जगते. तोपर्यंत फळे व बी देतच राहते. ➡️ जोजोबा पिकाचे महत्त्व : १) हे पीक हलक्या माळाचे पडीक व जेथे काही येत नाही अशा जमिनीत येते. २) कोणत्याही बागायत पिकापेक्षा जादा अर्थार्जन देणारे हे पीक आहे. ३) या पिकाचे सर्वात मोठे महत्त्व व वैशिष्ट्य म्हणजे कमी वृष्टी, अतिवृष्टी, धुके, वादळ, कडकडून कडक थंडी या सर्वांना तोंड देते. ४) याची लागवड बी लावून, रोपे करून व छाट कलमे वापरून ही करता येते. ५) याची पाण्याची गरज २५० मिली मिटर पाऊस इतकी कमी आहे. त्यामुळे राज्याचा दुष्काळी पट्टा व कमी पावसाचे प्रदेशात ते व्यापारीदृष्ट्या यशस्वी होऊ शकते. ६) दोन ओळीत १ ले तीन वर्षे आंतरपिके घेता येतात. ७) याच्या तेलाचा विविध पद्धतीने वापर होतो. या बियापासून तेल मिळते. ८) लागवड खर्च कमी, उठाठेव कमी, पीक संरक्षण खर्च कमी हे अनेक फायदे. ९) पानात विषारी घटक असल्यामुळे शेळ्या, मेंढ्या अगर जनावरे खात नाहीत, १० ) ३ - ४ वर्षानंतर बी व त्यापासून तेल मिळते १५० ते १६० वर्षे मिळतच राहते. ११) खाद्य तेल व कमी कॅलरीजचे आरोग्यदायक तेल म्हणून वापरता येते. १२) अत्यंत महागड्या क्रिममध्ये जोजोबा तेलाचा वापर होत असल्याने या तेलाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. १३) हे पीक करा व ४ - ५ पिढ्याचे दारिद्रय दूर करा. हा नवा व महत्त्वाचा संदेश या पिकापासून मिळतो. ➡️संदर्भ: Krishi Jagran, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
8
इतर लेख