गुरु ज्ञानAgroStar
जमिनीतील ओलावा कमी करण्यासाठी उपाययोजना
🌱सततचा पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे जमिनीत ओलावा जास्त कालावधीसाठी राहिल्यामुळे पिकामध्ये मर रोग, कंद कूज, मूळ कूज, करपा अशा विविध बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यापासून पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी साठलेले पाणी शेतातून बाहेर काढण्यासाठी उपाय करावे. त्यानंतर जमिनीतील ओलावा कमी करण्यासाठी अमोनिअम सल्फेट @25 किलो प्रति एकर ओल असलेल्या ठिकाणी टाकावे. पाऊस उघडल्यावर तातडीने कॉपर युक्त बुरशीनाशक व मुळी वाढीसाठी ह्युमिक सारखे पोषक
यांची एकत्रित फवारणी करावी.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.