AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करावी
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करावी
हिरवळीच्या पिकांमुळे जमिनीत नत्राची मात्रा वाढते कडधान्यवर्गीय पिकांची मुख्य पिकांच्या दोन ओळीत पेरणी करावी. यामुळे मुख्य पिकांसाठी नत्राची उपलब्धता वाढते तसेच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करतात. आच्छादनाद्वारे जमिनीतील ओलावा टिकतो. फळबागामध्ये आच्छादन आणि तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात.
ज्या शेतात हिरवळीची पिक घ्यावयाचे आहे त्याच ठिकाणी ते शाखीय वाढ झाल्यावर व पिक फुलोऱ्यात येण्याआधी नांगराच्या साह्याने गाडावीत. हि पद्धत खोल जमिनीत भरपूर पाऊस व सिंचनाची सोय असल्यास उपयुक्त आहे या पद्धतीमध्ये हिरवळीचे पिक म्हणून ताग, धैंचा, चवळी, गवार, मुग, उडीद या पिकांची लागवड करावी. हिरवळीचे पिके गाडण्याची योग्य अवस्था म्हणजे फुलोऱ्या येण्याआधी गाडावे. हिरवळीच्या पिकांचे पूर्ण विघटन झाल्यानंतर शेतामध्ये मुख्य पिकाची पेरणी करतात. कपाशी लागवड करताना कपाशी सोबत दोन ओळींच्या मध्ये एक ओळ धैंचाची पेरणी करून त्याची ३० ते ३५ दिवसांनी कापणी करून तिथेच जमिनीत गाडावे. अग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
95
0