AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांमधील कासदाह आजारामुळे दूध उत्पादनात होतेय घट !
पशुपालनAgrostar
जनावरांमधील कासदाह आजारामुळे दूध उत्पादनात होतेय घट !
➡️शेतकरी शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय करीत चांगले उत्पादन घेत असतात. यामधील प्रमुख व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्धव्यवसायावर जास्त भर देत आहेत. दुग्धव्यवसाय करत असताना शेतकऱ्यांनी जनावरांमधील आजारांकडे दुर्लक्ष करू नये.कारण याचा परिणाम दुध उत्पादनावर होत असतो. परिणामी अशा जनावरांचे बाजारमुल्यही कमी होते. त्यासाठी आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करणे गरजेचे असते.गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने कासदाह आजारावर नैसर्गीक उपचारांची शिफारस केली आहे. ही औषधे घरात सहज उपलब्ध होणारे आहे. शेतकरी कमी खर्चात तयार करू शकतात. ➡️कासदाह आजार होण्याची कारणे : 1) मोठी कास असणाऱ्या तसेच संकरित जनावरांमध्ये कास दाह होण्याचे प्रमाण जास्त असते. 2) वाढत्या वयाची जनावरे म्हणजे तिसऱ्या- चौथ्या वेतातील जनावरांमध्येही कासदाहाचे प्रमाण जास्त असते. 3) जनावरे बसण्याची आणि सभोवतालच्या जागेची अस्वच्छता. 4) धार काढणाऱ्या व्यक्तीची अस्वच्छता. 5) दूध पूर्ण न काढले गेल्यामुळे कासेला जखम झालेली होणे इ. ➡️घरीच तयार करा औषध : कोरफड, हळद, चुना आणि लिंबू वापरुन हे औषध तयार होते. यामध्ये २५० ग्रॅम कोरफड, ५० ग्रॅम हळद, १५ ग्रॅम चुना एकत्र मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करा. ➡️वापरण्याची पद्धत : 1) मुठभर पेस्टमध्ये १५० ते २०० मिली पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा. 2) जनावराची कास स्वच्छ धुऊन तयार केलेले मिश्रण पूर्ण सडावर लावा. हे मिश्रण दिवसातून १० वेळा सलग पाच दिवस लावा. 3) २ लिंबाचे काप दिवसातून दोन वेळा सलग तीन दिवस चारा. 4) दुधामध्ये रक्त किंवा लालसरपणा असेल तर वरील मिश्रणामध्ये दोन मुठी कडीपत्ता व गुळ याची पेस्ट दिवसातून दोनवेळा चारा. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
12
इतर लेख