AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
चिकट सापळे का आहेत इतके महत्वाचे?
🌱पीकाच्या सुरवाती पासून जेव्हा आपण पिवळे व निळे चिकट सापळे लावतो तेव्हा मावा,तुडतुडे,पांढरी माशी,थ्रीप्स यांचा बंदोबस्त करता येतो. तसेच विषाणूजन्य रोग पिकामध्ये पसरवन्या पासून रोखले जाते. त्यासाठी होणारा कीटकनाशकांवरील फवारणी खर्च वाचतो. त्यामुळे पिवळे व निळे चिकट सापळे किट व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावतात. 🌱रंगीत निळे व पिवळे चिकट सापळ्यांचा वापर करून रसशोषक किडींचे नियंत्रण तर होतेच सोबतच किडींच्या प्रादुर्भावाचे प्रमाण देखील तपासात येते. यानुसार शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक कीडनाशकांची फवारणी करता येते. पिवळ्या रंगाच्या सापळ्याकडे मावा, तुडतुडे, पांढरी माशी व हॉपर्स या किडी तर निळ्या रंगाच्या सापळ्याकडे फुलकिडे (थ्रिप्स) व नागअळीचे पतंग आकर्षित होतात यामध्ये या रसशोषक किडींचे व्यवस्थापन करण्यास मदत होते 🌱एकदा सापळ्यावर बसलेली कीड सापळ्यावर चिटकून राहते. किडीचे अन्नग्रहण व प्रजनन थांबते. प्रजनन थांबल्याने किडीची संख्या नियंत्रित होते. चिकट सापळ्यांचा असा फायदा होत असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी पिकाची लागवड केल्याबरोबर हे सापळे पिकामध्ये बसवावेत.आणि ते बसवण्याची योग्य पद्धत कशी आहे हे व्हिडिओ पाहून जाणून घ्या. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0