AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
चक्रीवादळाचे संकेत;महाराष्ट्रात पावसाचे वातावरण!
हवामान अपडेटलोकसत्ता
चक्रीवादळाचे संकेत;महाराष्ट्रात पावसाचे वातावरण!
➡️ बंगालच्या उपसागरामध्ये नव्या चक्रीवादळाचे संकेत आहेत. सध्या तेथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र आहे. महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी या चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नाही. ➡️ रविवारी विदर्भ, मराठवाडय़ात उन्हाचा तडाखा कायम होता. मात्र, पुढील दोन दिवसांत सर्वत्र दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ➡️ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. दिवसभर हवामान ढगाळ असल्याने वातावरणात काहीसा गारवा होता. ➡️ बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर २१ मार्चला चक्रीवादळात होणार आहे. पुढील दोन दिवस चक्रीवादळाची स्थिती कायम राहणार असून, ते अंदमान, निकोबारच्या दिशेने जाणार आहे. ➡️ महाराष्ट्रातही या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊसही झाला. अनेक भागात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मात्र, चक्रीवादळाचा मोठा परिणाम राज्यावर होणार नाही. संदर्भ:-लोकसत्ता, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
7
इतर लेख