जैविक शेतीAgrostar
घरीच बनवा सेंद्रिय एमिनो एसिड!
➡️ऍमिनो ऍसिड वापरण्याचे फायदे :
👉🏻कोणत्याही पिकाची सेटिंग करण्यास मदत करते.
👉🏻झाडांची व फुलांची,फळांची सेटिंग चांगली होती.
👉🏻झाडामध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढून पिके/रोपे अधिक हिरवीगार होतात
➡️ऍमिनो ऍसिड बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू : एक किलो गूळ, एक किलो सोयाबीन आणि 150 ग्रॅम बेसन पीठ
➡️बनवण्याची पद्धत :
👉🏻पाच लिटर पाण्याची टाकी किंवा भांडे.घ्या.सर्वप्रथम आपल्याला एक किलो सोयाबीन पाच लिटर पाण्यामध्ये आठ तास भिजत घालायचे आहेत.
👉🏻नंतर ते भिजलेले सोयाबीन आहेत असे त्या पाण्याबरोबर मिक्सरमधून बारीक करून काढायचे आणि त्यामध्ये एक किलो गूळ आणि 150 ग्रॅम बेसन पीठ बारीक करून टाकायचे आहे.
👉🏻जर पाणी पाच लिटर पेक्षा कमी झाले असेल तर त्यामध्ये पाच लिटर पाणी होईल एवढे पाणी टाकावे .ॲमिनो ॲसिड बनण्यासाठी सात दिवसाचा कालावधी लागतो .
👉🏻सात दिवस आपल्याला ते मिश्रण रोज सकाळी काठीच्या साह्याने हलवायचे आहे.
👉🏻सात दिवसांनी ते मिश्रण सुती कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे.आत्ता ते पूर्ण पणे फवारणे योग्य ॲमिनो ॲसिड तयार झालेले आहे.
👉🏻फवारायचे प्रमाण- 500 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारायचे आहे. दहा दिवसाच्या अंतराने फवारणी घेतल्यास योग्य तो परिणाम दिसतो.
➡️संदर्भ:-Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.