AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
घरगुती वापरासाठी खास सोलर सिस्टम!
समाचारAgrostar
घरगुती वापरासाठी खास सोलर सिस्टम!
➡️लहान कुटुंबाच्या बहुतांशी ऊर्जेची गरज भागवण्यासाठी दोन किलोवॅट क्षमतेचा सोलर सिस्टम ही पुरेशी ठरते. म्हणजे एकंदरीत विचार केला तर ज्या कुटुंबाचे विज बिल 100 ते 250 प्रति युनिट आहे, अशा कुटुंबांसाठी दोन किलोवॅटचा सोलर प्लांट उभारणे खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते. दोन किलो वॅट सोलर सिस्टम मध्ये 335 वॅटचे सहा सोलर पॅनल बसवणे गरजेचे आहे. ➡️दोन किलो वॅटच्या सोलर सिस्टम मध्ये 150 AH, 180 AH किंवा 200 AH च्या दोन बॅटऱ्या वापरल्या जातात. जर तुमच्याकडे अगोदरच बॅटरी उपलब्ध असेल तर तुम्ही या सोलर प्रणालीमध्ये तिचा वापर करू शकतात. परंतु तुम्हाला जर नवीन बॅटरी खरेदी करायची असेल तर यामध्ये पाच वर्षाच्या गॅरंटीसह बॅटरी खरेदी करणे महत्वाचे ठरते. ➡️दोन किलोवॅट सोलर सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही घरगुती सबमर्सिबल पंप, फ्रिज, पंखे, टीव्ही आणि लॅपटॉप सारखे साधने अगदी सहजपणे वापरू शकतात. एवढेच नाही तर तुमच्या घरामध्ये सोलर एसी असेल तर तुम्ही दोन किलो वॅट सोलर सिस्टमच्या साह्याने त्याचा सहज वापर करू शकतात. जर यामध्ये ग्रीड सोलर सिस्टम वर असेल तर तुम्ही साधा एसी देखील या माध्यमातून चालवू शकतात. ➡️दोन किलोवॅट सोलर सिस्टमची किंमत : तुम्हाला जर दोन किलोवॅटचा सोलर सिस्टम खरेदी करायचा असेल तर लागणाऱ्या उपकरणांसह तसेच त्या सोलर सिस्टमच्या इन्स्टॉलेशन इत्यादी बाबी मिळून सुमारे 1 लाख 20 हजार ते 1 लाख 40 हजार पर्यंत खर्च येऊ शकतो. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
82
13
इतर लेख