AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी एकात्मिक व्यवस्थापन टिप्स!
गुरु ज्ञानAgrostar
गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी एकात्मिक व्यवस्थापन टिप्स!
👉🏻सध्याच्या काळात रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांचा बेसुमार वापर केल्यामुळे उत्पादनात रासायनिक अंश आढळतात, कीड-रोग प्रतिकारशक्ती वाढते, शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन गरजेचे आहे. 👉🏻सुरुवातीचे उपाय: - लागवडीनंतर खोल नांगरणी करून जुने पीक व तण नष्ट करा. योग्य मल्चिंग वापरल्यास कीड-रोग कमी होतात. - प्रतिकारक्षम वाणांची निवड करून योग्य कालावधीत लागवड करा. 👉🏻पाणी व खत व्यवस्थापन: - स्वच्छ पाणी व ड्रीप/स्प्रिंकलरचा वापर करा. - चांगल्या कुजलेल्या शेणखताचा व जैविक खतांचा योग्य प्रमाणात वापर करा. 👉🏻कीड व रोग नियंत्रण: - पिवळे, निळे चिकट सापळे व कामगंध सापळ्यांचा वापर करून कीड नियंत्रण करा. - सुरुवातीला जैविक औषधे वापरा व नंतर गरज असल्यास रासायनिक औषधांचा वापर करा. 👉🏻पीक काढणीनंतर काळजी: - योग्य पद्धतीने पीक काढणी करून पॅकिंग करा. धान्य व कांदा हवा खेळती राहील अशा पद्धतीने साठवा. 👉🏻वरील उपायांमुळे रसायनांचा वापर कमी होईल, उत्पादनाचा दर्जा सुधारेल, आणि शेती शाश्वत होईल. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख