AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहूच्या पेरणीमध्ये १० टक्क्यांची वाढ
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
गहूच्या पेरणीमध्ये १० टक्क्यांची वाढ
ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये अनेक राज्यात झालेल्या पावसाचा रब्बी पिकांना फायदा झाला. सध्याच्या रब्बीमध्ये गहूच्या पेरणीत ९.७० टक्के, तर रब्बी पिकांच्या पेरणीत ६.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रब्बी पिकांची एकूण पेरणीत वाढ होऊन ५७१.८४ लाख हेक्टरमध्ये झाली आहे. जे की मागील वर्षी या कालावधीपर्यंत ५३६.३५ हेक्टरमध्ये झाली होती. रब्बीचे प्रमुख पीक गहूच्या पेरणीत वाढ होऊन चालू हंगामात २९७.०२ लाख हेक्टर झाली आहे. जे की मागील वर्षी या कालावधीपर्यंत गहूची पेरणी २७०.७५ लाख हेक्टरमध्ये झाली होती. संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, २७ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
137
0