AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू, हरभरा, मसूरच्या हमीभावात वाढ
कृषि वार्ताअॅग्रोवन
गहू, हरभरा, मसूरच्या हमीभावात वाढ
केंद्र सरकारने २०१८-१९ च्या रब्बी हंगामासाठी गव्हासह काही पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय बुधवारी (ता.३) घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानुसार गव्हाची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल १०५ रुपयांनी वाढवून ती १८४० रुपये क्विंटल करण्यात आली आहे. मसूर, हरभऱ्यातही वाढ
अन्य काही पिकांसाठीही प्रति क्विंटल एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली. ती अशी ः मसूर-२२५ रुपये, करडई-२४५ रुपये आणि हरभरा-२२० रुपये. या वाढीमुळे या तिन्ही पिकांसाठी शेतकऱ्यांना अनुक्रमे ४२७५ रुपये, ४९४५ रुपये व ४६२० रुपये असा प्रतिक्विंटल भाव मिळेल. याशिवाय जवसाची एमएसपी क्विंटलमागे ३० रुपयांनी वाढवून १४४० रुपये करण्यात आली आहे . संदर्भ –अॅग्रोवन ४ ऑक्टो १८
230
0