AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू पिकातील प्रभावी तण व्यवस्थापन!
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गहू पिकातील प्रभावी तण व्यवस्थापन!
बागायत वेळेवर आणि उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यानी खुरपणी करावी. पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही त्यामुळे पिकांची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते. तसेच वाढते मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकांचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो. गव्हामधील तण नियंत्रणासाठी - 👉 पेरणीनंतर २२ ते २५ दिवसा दरम्यान क्लोडीनाफोप प्रोपरगाईल १५% + मेटसल्फ्युरॉन मेथाइल १% डब्ल्यूपी @१६० ग्रॅम प्रति एकर, २००-२५० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 👉 फवारणीच्या वेळी तणे २-४ पानांच्या अवस्थेत असावीत याची काळजी घ्यावी. 👉 तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे. 👉 तसेच फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप वापरावा. पॉवर स्प्रे वापरू नये. हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-429&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
6
इतर लेख