गुरु ज्ञानAgroStar
गहू पिकातील तण व्यवस्थापन
👉गहू पिकामध्ये तणांचे अतिक्रमण टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तण पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी स्पर्धा करतात, ज्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट होऊ शकते. यासाठी तण नियंत्रण वेळीच करणे गरजेचे आहे.
👉गहू पेरणीनंतर 25 ते 35 दिवसांत एकदा खुरपणी व कोळपणी करावी, ज्यामुळे जमीन मोकळी राहते आणि तणांच्या वाढीला आळा बसतो. याशिवाय रासायनिक तणनाशकांचा वापर हा प्रभावी उपाय ठरतो. रुंद व लांब पानांच्या तण नियंत्रणासाठी ऍग्रोस्टारचे फॉगर तणनाशक (क्लोडिनिफोप प्रॉपरजील + मेटसलफ्युरॉन मिथिल घटक) वापरणे फायद्याचे ठरते.
👉हे तणनाशक प्रति एकर 160 ग्रॅम प्रमाणे 150 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणीसाठी पिकात योग्य "वापसा" स्थिती असणे महत्त्वाचे आहे. हे तणनाशक 2 ते 6 पानांच्या अवस्थेपर्यंत असलेल्या तणांवर प्रभावीपणे कार्य करते.
👉यामुळे तणांचे प्रभावी नियंत्रण होऊन गहू पिकाला अन्नद्रव्ये व जागा पुरेशा प्रमाणात मिळून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.